राज्य मंडळाचा बारावीचा निकाल ९९.६३ टक्के

मुंबई : ३ ऑगस्ट-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकाल यांनी निकाल जाहीर केला आहे. राज्याचा यंदाचा निकाल हा ९९.६३ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य व एचएससी व्होकेशनल या शाखांतील एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती.
त्यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९९.६३ टक्के आहे. सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल हा ९९.८१ टक्के लागला आहे. हा निकाल इतर विभागापेक्षा सर्वाधिक आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल हा ९९.३४ टक्के लागला आहे. तर यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून विद्यार्थीनींचा निकाल ९९.७३ टक्के लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल हा ९९.५४ टक्के लागला आहे. विद्यार्थींनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा ०.१९ टक्क्यांनी अधिक आहे.
अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या निराकरणासाठी मंडळाच्या स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या अनुषंगाने राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी टपाल, ई मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदवता येईल. त्यासाठीच्या अर्जाचा नमुना, तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच्या अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई मेल पत्ता आदी माहिती राज्य मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
कुठे पाहाल निकाल?
https://hscresult.net
11admission.org.in
https://msbshse.co.in
maharesult.nic.in
hscresult.mkcl.org

Leave a Reply