राज्यातील पदविकाधारक पशुवैद्यक बेमुदत संपावर

नागपूर : २ ऑगस्ट – पदवीधर पशुवैद्यकांप्रमाणेच जनावरांवर उपचार करण्याचे अधिकार मिळावे, या मागणीसाठी ‘नियमानुसार काम’ आंदोलन करणारे राज्यभरातील सर्व पदविकाधारक पशुवैद्यक रविवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील सुमारे ८ कोटी पशूंच्या चिकित्सेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पदविका डॉक्टर पंचायत समिती किंवा पशुचिकित्सालयापुढे धरणे देतील, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष सुनील काटकर यांनी सांगितले.
पदविकाप्राप्त डॉक्टरच सध्या राज्यातील ग्रामीण भागात पशुचिकित्सेचे काम करीत आहे. शासनाच्या अनेक दवाखान्याचे प्रमुखही पदविकाधारक पशुवैद्यक आहेत. मात्र त्यांना नियमाप्रमाणे पदवीधर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व सल्ल्यानेच उपचाराचे अधिकार आहेत. अनेक वर्षांपासून सर्व प्रकारचे उपचार करीत असतानाही शासनाने त्यांना पूर्ण उपचाराचे अधिकार बहाल केले नाही. ते मिळावे म्हणून त्यांचे आंदोलन सुरू आहे.

Leave a Reply