नागरिकांच्या सुख- दुःखात सहभागी व्हा – देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

नागपूर : २ ऑगस्ट – नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा, असे आवाहन करीत हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारतीय जनता पार्टीने नागपुरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान सुरू केले असून, दक्षिण- पश्चिम विधानसभा मतदार संघात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राजकारणात समाजसेवेचे योगदान महत्त्वपूर्ण असते. म्हणून आपले बूथ मजबुत करा. स्वच्छ प्रतिमेच्या युवकांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घ्या. एका बूथमध्ये ३० लोकांची कार्यकारिणी तयार करा. नागरिकांच्या घरोघरी जाऊन संपर्क साधा. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा, हे आपले पहिले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, खा. डॉ. विकास महात्मे, मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे यांच्यासह पायी चालत दोन बूथ अध्यक्षांच्या घरी गेले. एक बूथ अधिक ३० योजना समजावून सांगितली. पूर्व नागपुरात माजी खा. शिशुपाल पटले व आ. कृष्णा खोपडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. संजय अवचट, प्रमोद पेेंडके, सचिन कारळकर, प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम, उपमहापौर मनीषा धावडे, बाल्या बोरकर, चंदन गोस्वामी, महेंद्र राऊत, मनिषा अतकरे, सेतराम सेलोकर, जे.पी. शर्मा, राजू गोतमारे उपस्थित होते.

Leave a Reply