सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढविण्याचे जबाबदारी समाजाची – कर्नल अभय पटवर्धन

नागपूर : १ ऑगस्ट – लष्करातील सैनिक तळहाथावर शीर घेऊन सीमेवर उभा राहत २४ तास देशाचे रक्षण करत असतो अनेकदा अनेक जवान देशाचे रक्षण करताना शहीदही होतात, अश्या जवानांच्या कुटुंबाचे रक्षण करण्याची आणि त्यांना हिम्मत देण्याची जबाबदारी समाजाने पार पडणे गरजेचे आहे. देशातील सामाजिक संघटनांनी या संदर्भात सामाजिक जनजागृती करून सैनिकांचे मनोबल वाढवण्याचे काम करावे, असे आवाहन लष्करातील निवृत्त अधिकारी आणि युद्धशास्त्राचे अभ्यासक कर्नल अभय पटवर्धन यांनी केले.
भारत विकास परिषद नागपूर पश्चिम शाखेच्या वर्ष २०२१-२३ या कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात कर्नल पटवर्धन प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते. यावेळी भारत विकास परिषद विदर्भ प्रांताचे अध्यक्ष चंद्रशेखर भूशे, विदर्भ प्रांत सचिव सीमा मुन्शी, पश्चिम शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण समर्थ, सचिव शशिकांत सुरंगळीकर, मावळते अध्यक्ष अविनाश पाठक प्रभृती व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कर्नल पटवर्धन म्हणाले की, फक्त लष्करी जवानाचं देशाचे रक्षण करतो असे नाही तर देशातील प्रत्येक नागरिक हा आपल्या परीने देशसेवा करीत असतो. रस्त्यावर उभा असलेला पंक्चर दुरुस्त रनर, कार्यालयात काम करणारा कर्मचारी, व्यावसायिक हे सर्वच देशसेवक आहेत मात्र या सर्वांनी निस्वार्थ भावनेने देशसेवा करणे आज गरजेचे आहे. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या सभागृहात झालेल्या या पदग्रहण समारोहात भारत विकास परिषद नागपूर पश्चिम शाखेचे मावळते अध्यक्ष अविनाश पाठक यांनी आपली सूत्रे नवे अध्यक्ष नारायण समर्थ यांचेकडे सोपवली. यावेळी नव्या कार्यकारिणीला प्रांत महासचिव सीमा मुन्शी यांनी शपथ दिली. मावळते अध्यक्ष अविनाश पाठक यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा घेतला, नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण समर्थ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. भारत विकास परिषदेच्या देशभरातील गतिविधींबाबत माहिती विदर्भ प्रांताचे अध्यक्ष चंद्रशेखर भूशे यांनी दिली. आभार प्रदर्शन सचिव शशिकांत सुरंगळीकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रुती देशपांडे यांनी केले. कोरोनाचे नियम पाळून मोजक्याच उपस्थितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
वर्ष २०२१-२३ ची कार्यकारिणी अशी आहे,
पालक – अविनाश पाठक, अध्यक्ष नारायण समर्थ, उपाध्यक्ष – अरुणा पुरोहित, सचिव – शशिकांत सुरंगळीकर , सहसचिव – पंकज पत्की, कोषाध्यक्ष – ऍड नीरज जावडे, सहकोषाध्यक्ष – ऍड. सागर अशीरगडे, महिला प्रमुख – फाझील नाहिद, संस्कार प्रमुख – मोहन पथे, सेवा प्रमुख – ऍड. विवेक पळशीकर, कार्यक्रम प्रमुख – मोहन कुलकर्णी, ग्रामविकास प्रमुख – संदीप झंवर, संपर्क प्रमुख – श्रुती देशपांडे.

Leave a Reply