वयाची पंचाहत्तरी सुरु असताना त्यांनी बनवली ई-सायकल

वाशिम : १ ऑगस्ट – एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केला तर त्यासाठी वयाचं बंधन त्याला आड येत नाही हे सिद्ध केलं आहे वाशिमच्या सिद्धेश्वर पाठक यांनी. वयाची पंचाहत्तरी सुरू असुनीही त्यांनी सायकलला जुगाड करून ई-सायकल तयार केली आहे. त्यांच्या या हुशारीचं सर्वस्तरावर कौतूक होत आहे.
वाशिमच्या सिव्हिल लाईन भागात राहणारे सिद्धेश्वर पाठक हे ७५ वर्षीय व्यक्ती ३६ वर्ष इंदोर आणि वाशिमच्या विमानतळमध्ये नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत. उतरत्या वयात दुचाकी वापरणं कठीण होत चाललं होतं. त्यात गाडीचा तोल सांभाळणे कठीण होत होतं. तर दुसरीकडे वाढत चाललेल इंधनाचे दर. यावर पर्याय म्हणून सिद्धेश्वर पाठक यांनी ई सायकलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
सिद्धेश्वर यांचे लहान भाऊ हे रेडीओ टीव्ही मेकॅनिकच काम करतात. तर सिद्धेश्वर यांचे चिरंजीव हे कम्प्युटर दुरुस्तीचं काम करतात. त्यांनी त्यांच्या भावाच्या दुकानातून टाकावू वस्तू जमा केल्या तर मुलांच्या दुकानातून बेटरी आणि इतर साहित्य जमा केले. आणि सायकलला जोडून ई-सायकल तयार केली. बाजारपेठेतून मोटार विकत आणली आणि सायकलला जोडणी केल्यानंतर ई-सायकल रस्त्यावर धावायला लागली.
या सायकलला बनवण्यात सात हजार खर्च आला असून सायकलचा खर्च वेगळा आहे. नवीन ई-सायकल तयार करण्यासाठी १८ हजार रुपये खर्च येऊ शकतो असं सिद्धेश्वर यांनी सांगितलं. एक वेळा ५ तास चार्जिंग केल्यानंतर २० किमी अंतरावर सायकल धावते तर त्यासाठी फ़क्त 5 रुपये खर्च येतो. एक युनिट पेक्षा कमी विजेची खपत होते.
वृद्ध आणि बच्चे कंपनीसाठी ही ई-सायकल अतिशय फायद्याची असून पर्यायी इंधनाची बचत होऊन प्रदूषणही कमी होते. इतकंच नाहीतर या सायकलसाठी परवान्याची आवश्यकता नाही. लवकर या सायकलवर प्रयोग करून आणखी जास्त किलोमीटर कशी चालू शकते यासाठी प्रयत्न करणार असून भावाच्या इलेक्ट्रॉनिकच्या माहितीच्या आधारे आणखी प्रयोग करून खर्च कमी करण्याचा माणस असल्याचं पाठक यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply