बीफ खाण्याबद्दल मेघालायमधील भाजपच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

शिलाँग : १ ऑगस्ट – मेघालयमधील भाजप सरकारच्या एका मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चिकन, मटण आणि मासे खाण्याऐवजी मंत्री सानबोर शुलाई यांनी नागरिकांना बीफ खाण्याचा सल्ला दिला आहे. लोकशाही देशात प्रत्येक जण आपल्या मर्जीचं खाणं खाण्यासाठी स्वतंत्र आहे, असं भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले शुलई म्हणाले.
मंत्री सानबोर शुलाई यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. चिकन, मटण आणि मासे खाण्याऐवजी नागरिकांनी बीफ अधिक खायला हवं, असं ते म्हणाले. तसंच भाजपचा याला विरोध नसल्याचा दावाही त्यांनी केला. शुलाई यांनी गेल्याच आठवड्यात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. लोकशाही देशात प्रत्येक जण आपल्या आवडची खाणं खाण्यासाठी स्वतंत्र आहे, असं ते म्हणाले.
शुलाई यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चिकन, मटण आणि मासे खाण्याऐवजी बीफ खाण्यासाठी नागरिकांना प्रेरणा देतो. यामुळे भाजप गोहत्या बंदी करेल ही धारणा दूर होईल, असं पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय मंत्री शुलाई म्हणाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांच्याशी आपण चर्चा करू. आसाममधील नवीन कायद्यामुळे मेघालयात गुरांच्या वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खात्री करू, असं शुलाई यांनी सांगितलं.
मेघालय आणि आसाममध्ये सीमावाद आहे. यावर शुलाई यांनी उत्तर दिलं. राज्याने सीमेचं आणि नागरिकांची सुरक्षा करण्याची वेळ आली आहे. आसामचे नागरिक सीमावर्ती भागातील राज्याच्या नागरिकांचा छळ करत असतील तर फक्त चर्चा आणि चहा पिऊन गप्पा मारू नये. आपल्यालाही उत्तर द्यावं लागेल. आपल्याला जागेवरच उत्तर द्यावं लागेल. पण आम्ही हिंसेच्या बाजू नाही, असं सानबोर शुलाई म्हणाले.

Leave a Reply