काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष भाजपात !

नवी दिल्ली : १ ऑगस्ट- काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष असलेले गोविंददास कोंथऊजम यांनी आज रविवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या दिल्लीमधील पक्षकार्यालयात गोविंददास यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोविंददास यांचा पक्षप्रवेश झाला. यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलुनी यांनी रविवारी सकाळीच भाजपामध्ये एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यानुसार १२ वाजता गोविंददास यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. यावेळी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह हेदेखील उपस्थित होते. पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मी या निवडणुकांमध्ये भाजपासाठी पूर्ण क्षमतेनं काम करेन, अशी प्रतिक्रिया गोविंददास यांनी पक्षप्रवेशानंतर दिली.

Leave a Reply