२ ऑगस्टपासून २३ जिल्ह्यांमधील न्यायालयीन कामकाजास सुरूवात

नागपूर : ३१ जुलै – महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमधील न्यायालयीन कामकाजावरील निर्बंध उठविण्यात आले. त्यानुसार आता न्यायालयाच्या नियमित कामकाजाला २ ऑगस्टपासून सुरूवात होत आहे, अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल गोवारदिपे यांनी दिली.
कोरोना महामारीच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता न्यायालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील न्यायालयात ऑनलाईन पद्धतीने कामकाजाला सुरूवात झाली. परंतु, आता कोरोना महामारी आटोक्यात असल्याने न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी घेणे शक्य आहे. त्यामुळे निर्बंध हटवून न्यायालयातील कामकाज पूर्ववत करावे अशी मागणी महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषदेने तसेच विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. राज्य सरकारने नुकतेच मोठ्या प्रमाणात निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply