वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

जयचंदांचा पोळा !

जयचंदांच्या झेरॉक्स कॉप्या
दिल्लीत झाल्या रे गोळा !
शेतकऱ्यांच्या नावाखाली
भरला हो त्यांचा पोळा !

म्हणवून घेती किसान तरि ते
असती फक्त दलाल !
त्यांची रहीसी नि अय्याशी
बघुनी उठे सवाल !

तथाकथित हे किसान यांचे
जीवन आहे एसीचे !
लोळायाला हवेत यांना
गाद्या लठ्ठ नि गालीचे !

नाश्त्यामध्ये बदाम काजू
जेवणात व्यंजन नाना !
त्रिकाळ तिन्ही सुरूच असतो
उंची दारूचा घाणा !

दलालीच्या त्या मलाईचा जव
रतीब झाला हो बंद !
पेटुन उठले रागाने ते
जसे मस्तवाल गुंड !

खऱ्या किसाना परवडेल का
पंचतारी हे आंदोलन !
आंदोलन हे नव्हे असे ते
बदमाशांचे आक्रंदन !

देशद्रोही पंचमस्तंभी
यांच्या असती या टोळ्या !
शेतकऱ्यांच्या नावावरती
शेकति अपुलाल्या पोळ्या !

     कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply