मूलमध्ये राज्यातील पहिले पतंजली योगभवन

चंद्रपूर : २९ जुलै – निरामय आरोग्याच्यादृष्टीने योगसाधना अतिशय महत्वाची आहे. महाराष्ट्रातील पहिले पंतजली योगभवन चंद्रपूर जिल्ह्यातील मूलमध्ये उद्घाटित करताना मला मनापासून आनंद होत आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. योग भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात आ. मुनगंटीवार बोलत होते. नगर परिषदेने ठराव पारित करून योगभवन पतंजली योगसमितीला हस्तांरित करावे. संस्थेला लागणारे सर्व साहित्य आपण पुरविणार असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले. योगगुरू स्वामी रामदेव यांना आपण दिलेल्या निमंत्रणानुसार ते मूल येथे आले. त्यामुळे मूल येथे योगभवन उभारणे औचित्यपूर्ण असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे, ज्येष्ठ नागरिक विजय चंदावार, भगवान पालकर, पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, प्रभाकर भोयर, प्रशांत समर्थ, विनोद सिडाम, अनिल साखरकर, वंदना लाकडे, प्रभा चौथाले, चंद्रकांत आष्टनकर, अजय गोगुलवार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply