तुमसर शहरात तातडीने दिशा दर्शक फलक लावा – शिवसेनेची मागणी

भंडारा : २९ जुलै – तुमसर शहरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिमेंट रस्ते तयार करण्यात आले परंतु शहरातील विविध मार्गावरून जाताना दिशादर्शक फलक लावलेला नाही. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. शहरातून राज्य मार्ग ३५५ भंडारा- तुमसर- बपेरा रस्ता जातो तसेच शहर भागातून मोठ्या वाहनांना आवक व जावक मार्ग निश्चित करतांना मोठा गैरसमज होतांना निदर्शनास आले आहे. वाहनांच्या योग्य मार्गाने आवागमन न होता अयोग्य मार्गाने होत आहे. परिणामी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो व रस्त्याची दुर्दशा होते. मागील सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता यांचे समवेत चालकांची गैरसोय होणाऱ्या स्थळांची मोक्यावर जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून दिली होती व सदर स्थळी दिशा दर्शक फलक लावण्यासाठी सांगितले होते. मात्र सदर स्थळी अद्यापही दिशा निर्देश फलक लावण्यात आले नाही यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दखल घ्यावी. याबाबत शिवसेनेच्या वतीने उप कार्यकारी अभियंता विनोद चुऱ्हे यांना त्वरित फलक लावण्याबाबत कार्यवाही करावी अशी पत्राद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, वाहतूक सेनेचे दिनेश पांडे, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, कृपाशंकर डहरवाल, शाखा प्रमुख निखील कटारे, अरुण डांगरे सह सहाय्यक अभियंता अंकुश चौधरी, व्ही. एम. सुतार उपस्थित होते.

Leave a Reply