आ. प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांच्या विरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा

ठाणे : २९ जुलै – भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला आहे. रीतसर प्रक्रिया करून हा दावा दाखल केला गेला असून, सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तर द्यावे लागणार आहे.
मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांचे पती किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून १६ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सीआरझेड व कांदळवन क्षेत्रात केले आहे. त्यात पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून सर्व अनधिकृत शौचालयांची बिलेही वसूल केली आहेत, असा आरोप करीत याप्रकरणी सोमय्या पती-पत्नींवरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात केली होती.

Leave a Reply