अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

चंद्रपूर : २८ जुलै – शेतकाम आटोपून घराकडे परतणाऱ्या एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्लयात शेतकरी सुरेश खिरवटकर गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास महानगरालगतच्या दुर्गापूर परिसरातील भटाळी शेतशिवारात घडली.
जखमीला येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून भटाळी परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. या परिसरात वेकोलि प्रशासनाकडून मातीचे ढिगारे टाकल्या जाते. त्यामुळे या परिसरात मानवनिर्मित झुडपी जंगल निर्माण झाले असून, हे जंगल आता वन्यप्राण्यांसाठी आसरा झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील झुडपी जंगल नष्ट करून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी वनविभाग व वेकोलि प्रशासनाकडे करण्यात आली.
पण दोन्ही विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता वन्यप्राण्यांचा वावर येथे मोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांवर होणार्या हल्लयात वाढ झाली आहे. या हल्ल्यस वनविभाग व वेकोलि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आता गावकरी करू लागले आहेत. जखमी खिरवटकर यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, व अन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply