वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

पत्यामधले राजे !

रामा रामा रामा म्या
काय करुन बसलो !
राजा होतो काल, आज
पट्टेवाला बनलो !

राजे राजे म्हंतेत मले
माहे सारे चेले !
पर , पत्यामधला एक म्या
ठाउक हाय मले !

ऐक्के, दुर्रे, जोकर हासतेत
हाल पाहुन माझे !
“गुरु गुरु ” म्हंते मले
जेलामधला वाझे !

कोरोन्यानं पावसानं
कहर असा केला !
हालत माही झाली जसा
बळी द्याचा हेला !

थकलो भाऊ पुरी करता
तीन टांगी शर्यत !
सहन होत नाही आनं
कोना नाही सांगवत !

  कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply