लोककलावंतांवर उपासमारीची वेळ – २९ जुलैपासून राज्यस्तरीय आंदोलन

गोंदिया : २७ जुलै – कोरोना संक्रमण व टाळेबंदीच्या समस्येला लोककला व नाट्य कलावंत तसेच त्यावर उपजीविका करणारे कामगार सामोरे जात आहेत. मात्र, शासनाकडून त्यांना कोणतीही मदत नाही. आपल्या मागण्या शासनाच्या कानापर्यंत पोहचविण्यासाठी २९ जुलैपासून तीन टप्प्यात राज्यस्तरीय आंदोलनात जिल्ह्यातील कलावंत, कामगार सहभागी होणार आहेत.
कोरोना महामारीमुळे लागलेल्या टाळेबंदीच्या काळात लोककला, नाट्यकला, चित्रपट या क्षेत्रातील कलावंत, कामगारांचे रोजगाराचे साधन हिरावले गेले आहे. अनेक कलावंत, कामगार बेरोजगार झालेे आहे. टाळेबंदीत शिथिलता मिळाली असली तरी या क्षेत्रावर अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र असे करताना शासनाद्वारे त्यांना कोणतीही मदत देण्यात आली नाही. परिणामी अनेक लोककलावंतांवर, कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २९ जुलैपासून तीन टप्प्यात आंदोलन करण्याचा राज्यस्तरीय निर्णय घेण्यात आला आहे.
या आंदोलनासंदर्भात नुकतीच जिल्ह्यातील कलावंतांची बैठक झाली. यात राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला दिर्ग्दशक दिलीप कोसरे, हिराज फिल्म प्रोडक्शनचे दिनेश फरकुंडे, सरस्वती संगीत समुहाचे टिळक दीप, गंधार म्युझिकल ग्रुपचे आशिष देशभ्रतार, राजू चौरसिया, तबरेज खान, संविधान मैत्री संघटनेचे अतुल सतदेव उपस्थित होते.

Leave a Reply