गोंदियातही जमावाने केलेल्या मारहाणीत मद्यपीचा मृत्यू

गोंदिया : २७ जुलै – नागपूर येथे दोन दिवसापूर्वी घडलेली घटना ताजी असताना, गोंदियाजवळील बनाथर येथे संतप्त जमावानेे सामुहिकरित्या केलेल्या मारहाणीत मद्यपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कैलाश भजनदास मोरध्वज (४०) असे मृतकाचे नाव आहे.
मृतक कैलाश हा दुपारी २ वाजतापासून मद्यधुंद अवस्थेत तो राहत असलेल्या परिसरात अश्लिल शिवीगाळ करीत होता. हा प्रकार मध्यरात्री दीड वाजतापर्यंत सुरु होता. अखेरीस या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांचा सयंमाचा बांध तुटले व समाजाने त्याच्या घरात शिरुन सामुहिकरित्या लाथाबुक्क्या, काठ्यांनी मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
यावेळी कैलाशच्या वडीलांनाही मारहाण झाल्याने ते जखमी झालेे. याप्रकरणी कैलाशचे वडील भजनदास (७१) यांच्या तक्रारीवरुन रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

Leave a Reply