उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसैनिकाने कोरोनामुळे आधार गमाविलेल्या कावळे कुटुंबियांना दिला आधार

गडचिरोली : २७ जुलै – कुटुंबातील कर्ता पुरूष अचानक निघून गेल्यानंतर कुटुंबियावर मोठा आघात निर्माण होतो. कुटुंबिय अठराविश्व द्रारिद्रयात जीवन जगणारे असेल तर कुटुंबियावर आभाळ कोसळल्याप्रमाणे स्थिती निर्माण होउन कुटुंबाची कशी अवस्था होते याची कल्पनाच न केलेली बरी. कोरोनाच्या महामारीत अनेक कुटुंबियांना आधार गमाविलेला आहे. मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या गडचिरोली शहरातील शिवनगर येथील राजेंद्र कावळे यांचा कोरोनामुळे मे महिन्यात मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात मृत्युुमुळे कुटुंबावर आभाळ कोसळले. आधार गमाविलेल्या कावळे कुटुंबियाची अवस्था कळताच गडचिरोली येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी मृतकाच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारून निराधार झालेल्या कुटुंबियाला आधार दिला आहे. एवढेच नव्हे तर कात्रटवार यांनी कावळे कुटुंबियांना सहा महिने पुरले एवढे अन्नधान्य व आर्थिक मदत देऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस सेवाभावृत्तीने साजरा करून समाज व राजकारण्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
गडचिरोली शहरातील शिवनगर (बेघर वस्ति) येथील राजेंद्र कावळे यांचा 14 मे 2021 रोजी कोरोना मुळे मृत्यु झाला. कावळे हे मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या अकस्मात मुत्यू मुळे कुटुंबावर मोठा आघात झाला कावळे यांच्या पच्यात पत्नी कविता आणि रितिक व रोशन ही दोन मुले आहेत. मोठा मुलगा रितिक हा बीए अंतिम वर्षाला शिकत असून लहान मुलगा रोशन 12 वीत शिकत आहे. घरात अठराविश्व दरिद्र आणि वडीलाचा कोरोना मुळे झालेला मृत्यू पुढे शिक्षण कसे घ्यावे या चींतेत दोन्ही भावंड सापडले. सदर बाब शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांना शिवनगर येथील शिवसैनिकानी लक्षात आणून देताच त्यांनी मृतक रवींद्र कावळे यांच्या दोन्ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारल्याने कविता कावळे यांचे डोळे आनंदाने पानावले होते. असे सामाजिक कार्य फक्त शिवसेनाच करु शकते असे त्या म्हणाल्या शिवसेनेच्या या कार्य प्रति त्यांनी कृतज्ञता वेक्त केली.
या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख , अरविंद कात्रटवार, शिक्षक सेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर बगमारे, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,गणेश पीठाले,संजय बोबाटे,अनिल कोठारे,विलास दाजगये,अमोल मेश्राम,स्वप्निल खांडरे, निकेश लोहबरे,नीलकंठ मेश्राम,कमलेश कोब्रागड़े,सुभाष ठाकरे,निखिल बरसागड़े,अजय मेश्राम, दिलीप मेश्राम, मोरेश्वर मेश्राम,राहुल मोटघरे, आकाश तडलवार,तेजस वाकड़े,धनवंत मेश्राम, साजन गुरनुले, कार्तिक भोयर,तेजस सहारे, निखिल लेनगुरे, समीर खोबरागड़े,पंकज जुवारे,रूपेश निकारे, साहिल कतरोजवार, गणेश खोबरागड़े, राकेश कपकार, गुरु सहारे,कविता कावळे,दुर्गा कांबले,जोति पिपळशेन्डे,कल्पना गरमले, सुरेखा चापले,सविता मदनकर,सुशीला सोनटके, सुधीर बोरकर,भारत कांबले, भावराव नांनावरे,लक्ष्मण सयाम,रोशन कावळे,शांताराम निमगड़े,गोपाल पानसे, यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply