आहार शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांचे निधन

नागपूर : २७ जुलै – तळागाळातल्या वर्गाला पोषक आहार मिळावा यासाठी अवघे आयुष्य वेचणारे शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी लढणारे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आहार शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी यांचे आज निधन झाले.
लाखोळी डाळीवरील बंदी उठवण्यासाठी व लाखोळी डाळ खुल्या बाजारात विक्रीला उपलब्ध व्हावी यासाठी डॉ. शांतीलाल कोठारी यांनी तब्बल ४० वर्ष लढा दिला. सोयामिल्कची नागपूर शहराला सवय लावणारे म्हणूनही त्यांची ओळख आहे. मोहफुलावरील बंदी उठविण्यातही त्यांचा मोलाचा सहभाग सहभाग राहिलेला आहे. अकॅडेमी ऑफ न्यूट्रिशन इम्प्रुव्हमेंट या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून डॉ. कोठारी यांनी गेली चार दशके योग्य आहराबाबत्त जनजागृतीचे काम केले आहे.
जनजागृतीच्या या कामात त्यांनी अनेकदा सरकारशी लढाही दिला आहे. त्यांचा सर्वात मोठा लढा म्हणजे लाखोळी डाळीवरील बंदी उठविण्याचा जो लढा त्यांनी ४० वर्षे लढला आणि त्यात यशस्वीही झाले.

Leave a Reply