केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन

नागपूर : २६ जुलै – पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, घरगुती गॅसचे सातत्याने वाढते दरवाढ, राजकीय नेते, पत्रकारांची हेरगीरी तसेच भ्रष्टाचारप्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. तत्पूर्वी संविधान चौक येथे कार्यकर्त्यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी पालमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार, आ. विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, मनपा विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, एस. क्यु. झामा तसेच युवक काँग्रेसचे रश्मी बर्वे, राहुल सिराया, कुंदा राऊत, नितीन कुंभलकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात मागण्यांचे विविध फलक घेऊन बोल रे साथी हल्ला बोल…, मोदी है तो महंगाई है… अशी नारेबाजी करीत वाढत्या महागाईचा जाहीर निषेध केला.
त्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुनील केदार म्हणाले, 2014 साली भाजपाने जनतेला अनेक आश्वसन देत सत्ता मिळविली. मात्र, या सात वर्षात महागाई, बेरोजगारी यामुळे जनसामान्य व तरुणांची निराशी केली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी आपल्या मागण्यासांठी दिल्ली दरबारी बसला आहे. मात्र, त्या शेतकर्यांचा आवाज ऐकाला केंद्राला वेळ नाही. निव्वळ घोषणा द्यायच्या एवेढच या सरकारने केले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या ताकदीवर जनसामान्यापर्यंत हा आवाज घेऊन जायचे आहे. तसेच 2024 च्या निवडणूकीमध्ये या सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्रीत व्हा असेही केदार यांनी यावेळी आवाहन केले.
तर कुणाल राऊत म्हणाले, महागाईविरोधात भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी संसदेला घेराव केला जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नागपुरातून बाईक रॅली काढणार आहेत असेही ते म्हणाले. त्यानंतर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आ. विकास ठाकरे यांच्यासह इतर वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.

Leave a Reply