राज कुंद्राच्या कार्यालयात पोलिसांना सापडलं गुप्त कपाट

मुंबई : २५ जुलै – राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती व उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यापासून राज कुंद्रा हे चर्चेत आहेत. शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पुरावे शोधण्यासंदर्भात कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी अटकेपूर्वीच कुंद्रांची चौकशी केली होती. पोलिसांनी राज कुंद्रांसह शिल्पा शेट्टी-कुंद्रा यांच्या घरावर छापाही टाकला. पोलिसांनी घराची त्याबरोबर कार्यालयाची झाडाझडती घेतली. यातून नवीन माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे .पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या घरात इलेक्ट्रॉनिक गॅझेट आढळून आली, ती जप्त करण्यात आली आहेत. त्यातच कार्यालयात काही गुप्त कपाटही आढळून आली असल्याची माहिती समोर आली आहे. अश्लील चित्रपट निर्मित प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांना शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विआन आणि जे.एल. स्ट्रीम कंपनीच्या कार्यालयात एक लपवलेलं कपाट सापडलं आहे.

Leave a Reply