महिला पोलिस कर्मचारीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल, गुन्हा दाखल

बुलडाणा : २५ जुलै – पोलीस म्हटल्यावर भल्याभल्या गुन्हेगारांना घाम फुटत असतो. पण, बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा इमेल हॅक करून हे फोटो याच महिला पोलीस कर्मचारीच्या व्हॉट्सअँपवर पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा ग्रामीण पोलीस दलात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीसोबत हा प्रकार घडला आहे. आरोपीने या महिलेला ई-मेल हॅक केला. त्यानंतर पीडित महिलेनं आपले काही फोटो हे ई-मेलवरील फोल्डरमध्ये ठेवले होते. ई-मेल हॅक झाल्यामुळे आरोपीच्या हाती हे फोटो लागले.
त्यानंतर पीडित महिला कर्मचारीची बदनामी करण्याच्या हेतून ७०५८७ २५५०५ या क्रमांकावरून हे सर्व फोटो व्हॉट्सअँपवर व्हायरल करण्यात आले आहे. बघता बघता हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. हे फोटो जेव्हा पीडित महिलेलाच मिळाले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडित महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
या महिला पोलीस कर्मचारीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध विनयभंग तसंच आय टी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे बुलडाणा जिल्ह्यात महिला पोलीसच सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या घटनेमुळे बुलडाणा जिल्हा पोलीस प्रशासनाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.

Leave a Reply