पंतप्रधानांनी केले मन की बात मधून पदक विजेत्या मीराबाई चानूच अभिनंदन

नवी दिल्ली : २५ जुलै – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचं अभिनंदन केलं. तसंच ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना बघून रोमांचित झालो. खेळाडूंचा उत्साह वाढवणं गरजेचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. करोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण करोना अजूनही गलेला नाही. यामुळे कुठलाही उत्सव असो की कार्यक्रम यावेळी करोनाच्या नियमांचं पालन करणं विसरू नका, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा कर आहेत. यावेळी स्वतंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण केले जात आहे. यामुळे १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नक्की म्हणा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. ‘नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट’ या मंत्रासह आपल्याला पुढे जायचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
१५ ऑगस्टला यंदा राष्ट्रगीताशी संबंधित एक प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रगीत म्हणावं. यासाठी एक वेबसाइटही बनवण्यात आली आहे. राष्ट्रगानडॉइन. स्वातंत्र्याचे ७५ वर्षे साजरे करत असताना १२ मार्चला साबरमती आश्रमातून ‘अमृत महोत्सव’ला सुरवात करण्यात आली होती. या दिवशी गांधीजींच्या दांडी यात्रेचे स्मरण केले गेले.
उद्या २६ जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिलची लढाई भारतीय सैन्याचे शौर्य आणि संयमाचे प्रतीक आहे. संपूर्ण जग याचा साक्षी आहे. यावेळी हा ‘कारगिल विजय दिवस ‘अमृत महोत्सवा’दरम्यान साजरा होत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘मन की बात’ मध्ये मांडले जाणारे ७५ टक्के विचार आणि संशोधन हे ३५ वर्षांखाली तरुणांचे आहेत. एक प्रकारे ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशातील तरुण चालवत आहेत. ‘मन की बात’ हा त्यांच्या सकारात्मक विचारांचे आणि संवेदनशीलचे माध्यम आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

Leave a Reply