धरणाबाहेर आलेली मगर अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार

चंद्रपूर : २५ जुलै – वरोडा, वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या साखरा चारगाव रस्त्यावर मगर गंभीर जखमी अवस्थेत आढळली. वनकर्मचाऱ्यांनी पशुचिकित्सालयामध्ये उपचाराकरिता नेले असता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. वरोडा तालुक्यात मागील दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे चारगाव धरण तुडुंब भरले आहे. तालुक्यातील चारगाव खुर्द ते साखरा रस्त्यावर मगर जखमी अवस्थेत आढळले. नजीकच्या चारगाव धरणातून मगर बाहेर आल्याचे मानले जात आहे. मगरीचे वय तीन ते चार वर्षे असून, वजन जवळपास ६० किलो आहे.
उपचाराकरिता मगरीला पशुचिकित्सालयात नेले असता पशुवैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. तिथेच शवविच्छेदन करण्यात आले. मगर एखाद्या वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत पावले असावे, अशी शक्यता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जांभळे यांनी वर्तविली. मृत मगरीवर वरोडा वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply