टोकियो ऑलिम्पिक – मेरी कोमने ४ :१ने जिंकला सामना

टोकियो : २५ जुलै- मेरी कोमने राउंड ऑफ ३२मध्ये विजय मिळवत टोकियो ऑलिम्पक स्पर्धेचा श्रीगणेशा केला आहे. तिने सामना ४:१ च्या फरकाने जिंकला. सामन्यात उत्कृष्ठ असा बचावात्मक खेळ दाखवत मेरीने विजय मिळवला. या शानदार विजयामुळे मेरीकडून पदकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
टोकियो ऑलिम्पिक २०२०स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे. भारतानं दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या रौप्यपदकासह आपल्या पदकाचं खातं उघडलं. आजही भारत अनेक खेळात भाग घेईल, मात्र, दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही स्टार खेळाडू मनु भाकर आणि यशस्विनी देसवाल १० मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नाहीत.
आज रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू बॅडमिंटन, हॉकी, बॉक्सिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, टेनिस आणि स्विमिंग यामधील आपलं कौशल्य दाखवतील आणि प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान उभं करतील. याशिवाय, सेलिंग, नौकाविहार, कलात्मक जिम्नॅस्टिक आणि स्विमिंगमध्येही भारत आपला दम दाखवणार आहे.

Leave a Reply