सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

आणि विठ्ठल ढसा ढसा, ओक्साबोक्शी रडला

सत्तेसाठी हिंदुत्व गहाण ठेवलेल्या मामु (माननीय मुख्यमंत्री) ने उर्दू भवनाची मुहूर्त मेढ रोवली, गोल जाळीदार टोपीतून संकेत दिले की आता हिंदू संस्कार बस्सं. हिंदू पंचांग सुद्धा सत्तेपायी ह्याला नको, ज्या हिंदू बळावर, हिंदू मतांवर आजवर शिवसेना तगली त्या हिंदू धर्मावर लांछनांचा पाऊस पाडंत, पंढरपूर यात्रा, वारकरी, पायवारी ह्या सर्व विठ्ठलाच्या भक्तांचा अपमान करीत, मामु मोठ्या एकादशीला विठ्ठलाची पुजा करायला दुस-यांदा रवाना झाले. सोबत आपले कुटुंब – आपली जबाबदारी. आपला महाराष्ट्र पक्ष – गेला खड्ड्यात, वारक-यांची पायवारी – कोरोना पसरवी, वारक-यांची श्रद्धा – फक्त अंधश्रद्धा, महाराष्ट्राचा आताचा मामु – आजपर्यंतचा सगळ्यात गंदा.
“विठ्ठल” ज्या नावाने लाखो भक्त तरुन जातात, ज्याच्या पायवारीने भक्तांना धन्यता लाभते, पुढल्या वर्षीच्या पायवारीच्या आशेने जे भक्त जगत असतात, घरातल्या छोट्या मोठ्या सुखदु:खात विठु ला सामावून घेतात. कितीही चांगला प्रसंग असो आनंदाच्या क्षणी तो सर्व आनंदी क्षणांचा मानकरी विठ्ठलाकडे त्याचा मान देऊन – धन्यता पावतात. आणि अतिदु:खाच्या प्रसंगी विठ्ठला सोडीव रे यातून म्हणत परत विठ्ठलाला साकडं घालतात. आणि अशा निरागस, भोळ्या भक्तिला आवर्जुन प्रतिसाद देणारा तो विठ्ठल. तुमच्या भक्तिमध्ये भक्तिभाव, तन्मयता, निरागसता आणि समर्पण असले की झाला विठ्ठल तुमचा.
भक्तजन हो – संत श्री तुकाराम महाराजांना सदेह वैकुंठाला न्यायचे उदाहरण फक्त विठ्ठल भक्तीत. आणि मामु ने अशा निरागस भोळ्या भाबड्या भक्तांना कोरोनाच्या नावाखाली पायवारी नाकारुन घरात बंदिस्त राहण्याचे आदेश दिले. काय भक्तांचा हा दुसरा टाहो विठ्ठलाच्या कानी पडला नसेल?
मामु घोडचूक करताहात. विठ्ठलाच्या भक्तांना बंदिस्त करताहात. मामु स्वतः नाकर्ते सरकारचा धनी.कोरोनाच्या नावाने घाबरणारा घरघुशा घरकोंबडा. घर एके घर – कोरोनाच्या नावाने घराची घर घर. वर्ष भर घरात पण विठ्ठल मंदिर बंद करून परत पुजेला सहकुटुंब मंदिरात.
ज्याला सरकार कसे चालवायचे कळंत नाही, ज्याला भक्तांच्या भावना कळंत नाही, अक्कल समयाधीशाच्या चरणी गहाण, सं-जयचंद ह्याचा सल्लागार महान. चला मामु सत्ता संभालने – हरे रंग को उंचा उठाने – भगवा से गद्दारी – बसं! अब मॅडम की चाकरी. अशा नेतृत्वाच्या हाती सत्ता आली आणि महाराष्ट्राची जनता हलाल झाली.(वाचकहो – शब्दाचा कटाक्ष समजा) आता न्याय कुणाकडे? न्यायाची रदबदली कुणाकडे? स्वतः सरकार असे म्हणतात वाझेबॉंड काढुन वसुली करतेय, वसुलीचा मालक राजीनामा देऊन मोकळा – भुमिगत झाकोळला. केंद्रात नाही दम – म्हणेल पकडके लाएंगे हम – बस जनता का यही गम… गैर जमानती वॉरंट ज्याच्या नावाने त्याला केंद्र सरकार शोधून काढू शकत नाही. ही भारतीय संविधानाची अवहेलना नाही का? आणि अशा लोकांना आम्ही निवडुन देतो ज्याची संविधानाला मान्यता द्यायची लायकी नाही.
आमचा मामु पण मुख्यमंत्री बनण्याच्या लायकीचा नव्हता पण समयाधीश म्हणतात सं-जयचंद ने गळ घातली आणि मामु गळाला फशी पडला आणि जनाब ठाकरेंना दिलेल्या वचनपूर्ती साठी महाराष्ट्र नावाचा “पक्ष” चालवायला सज्ज झाला किंबहुना फेसबुक वर Face दाखवंत रटाळ वाणीने खट्याळ लोकांना पिकवंत आपल्या अज्ञानाचे पोवाडे स्वतः गाऊ लागला. “अज्ञानात सुख असते” ही म्हण जर अनुभवयाची असेल तर महाराष्ट्राचा मामु एक उत्तम उदाहरण आहे. राज्य कसे चालवायचे माहिती नाही आणि चला मुरारी हिरो बनने – चड्डी फटी, धाव केंद्राकडे – बटन तुटी, धाव केंद्राकडे – बकल उसव्या, धाव केंद्राकडे – आॅक्सिजन साठी चालक नाही, धाव केंद्राकडे – मराठा आरक्षण, धाव केंद्राकडे – ओबीसी आरक्षण, धाव केंद्राकडे – मुस्लिम आरक्षण, मविआ सरकार देणार – उर्दू भवन, मविआ सरकार देणार – सहकार क्षेत्र, राज्य सरकारच्या अखत्यारीत – सहकारी क्षेत्रातील घोटाळे तपासणी, केंद्र सरकारला अधिकार नाही – पैसा दे पैसा कोरोना साठी , केंद्र सरकार – पैसा दे पैसा लस लावण्यासाठी, केंद्र सरकार – पैसा दे पैसा आदित्यच्या लग्नासाठी, केंद्र सरकार…………..
मामु ही वारकरी मंडळी जितकी निरागस, भोळ्या मायेनी विठ्ठलावर प्रेम करतात त्यांच्या भावनांशी मामु तू खेळतोय, ज्या तन्मयतेने विठ्ठल भक्त, विठ्ठलाला आळवतात त्या तन्मयतेला तू छेडतोयस. मामु तुला कळंत नाही तू कुठल्या क्षेत्राला आव्हान दिलंय, अध्यात्म आणि भक्ती हा तुझा पिंड नाही. आपल्याला माहिती नसलेल्या क्षेत्राशी आपण वल्गना करु नये, चालंत आलेल्या रुढी परंपरांना स्थगिती देऊन व्यत्यय आणू नये. अक्कल गहाण ठेवली असली तरी विठ्ठल भक्तांची कोंडी करु नये, विठ्ठल भक्तिभावाला आव्हान कधी देऊ नये. कळंत नसलेल्या हिंदू भक्तिमार्गासाठी संतांशी सल्लामसलत करुन सुयोग्य मार्गदर्शन हा पर्याय पण मामु संतांची हत्या करण्या-या महापातकी महाराष्ट्र पक्षाचा मामु – कसा न्याय देणार रे तू विठ्ठल भक्तांना ???? मामु विठ्ठल भक्तांशी केलेली प्रतारणा तुला महागात पडणार.
मागले वर्ष – कोरोना वर्ष – विठ्ठल भक्तांनी मनावर दगड ठेवून अटळ पायवारी टाळली, पायवारी कोरोनाच्या नावाने बहाल करीत घरातूनच तुला भक्तिभावाने हात जोडून, भक्तांची चुकी नसताना देखील येवू शकत नाही म्हणून काहींनी उत्स्फूर्त अश्रू ढाळत क्षमा मागितली, काही मनातल्या अश्रू ढाळत होते तर काहींच्या भक्तिचा बांध फुटला आणि विठ्ठला तुझ्या नावाने टाहो फोडत रडत होते की विठ्ठला सांग सांग सांग विठ्ठला – आमच्यात आमच्या भक्तित अशी काय कमी होती की आम्हाला ह्या वर्षी दूर लोटलंस! काय विठ्ठलाला कळंत नव्हतं – आपल्या भक्तांच्या वियोगांच् दु:ख ? काय विठ्ठलाला ऐकु येत नव्हता – आपल्या भक्तांचा टाहो ? काय विठ्ठलाला पाझर फुटंत नव्हता – आपल्या भक्तांच्या अश्रूंमुळे ?
मामु फक्त भारताची संस्कृती, विठ्ठल भक्तांची सभ्यता आणि कोरोनाची संविधानाची पायरी वाचविण्यासाठी विठ्ठल आणि भक्त मुग गिळुन, हिंदू धर्म ध्वज पताका फडकावत गप्प राहिली आणि सगळ्यांच्या छाताडावर लाथा घालंत मामु तुम्ही पोहोचलात आपले कुटुंब – आपल्या जबाबदारी सह. पूजा करायला. वर्षभर घरात पण विठ्ठल मंदिर बंद करून, एकादशीला मात्र मुख्यमंत्री पदाची अवहेलना करीत, पुजेचा मान घेण्यासाठी मंदिरात.
मामु (माननीय मुख्यमंत्री) – मामु (माजी मुख्यमंत्री) देवेंद्र फडणवीसांनी हा पुजेचा मान अनिल आणि वर्षा जाधव ह्यांना दिला होता. तुम्ही पण घरबसल्या असे करू शकत होता. कोणाही विठ्ठल भक्त दांपत्यास हा मान देऊन तुम्हाला स्वतः चा मान वाढवता आला असता पण नाही !!!! नाही !!!!!! नाही ????? नाही !!!!!!! मुख्यमंत्री पदाची आन, पदाची पत, पदाची मर्यादा, पदाचा मान सगळे उल्लंघुन चालक-मालक तत्वावर तुम्ही स्वतः गाडी चालवंत विठ्ठल पुजेचा मान घ्यायला सुसाट निघालांत. विसरून गेलात विठ्ठल भक्तांना कोंडून ठेवले आहे, विठ्ठल भक्तांची कोंडी केली आहे. विठ्ठलाला पुजा निरागस भक्तांची आवडते, विठ्ठलाला पुजा निस्वार्थी वृत्तीने केलेली आवडते, विठ्ठलाला पुजा शुद्ध अंतःकरणाने केलेली आवडते. आणि आमच्या स्वार्थी मामुने सर्व विठ्ठल भक्तांची वासलात लावीत, खोट्या आश्वासनांने बरबटल्या हाताने, स्वार्थी हृदयाने आणि हिंदू विरोधी अंत:करणाने पुजेत हात घातला. विठ्ठलंच् तो मामु पहिल्यांदा सगळ्या चुका माफ. आणि तुला वाटलं पुजा फळली!!!!! तूही बाहेर येवून सांगितले की कोरोना साठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी विठ्ठलाला साकडं घातलं वगैरे वगैरे …… मामु तुला खरं सांगु??? तू शुद्ध अंतःकरणाने पुजा केली असती तर विठ्ठलाने कोरोना केव्हांच घालवला असता. पण तुझ्यात खोट. तू हेंच सांगितले असणार – विठ्ठला कोरोना असांच् राहू दे आणि केंद्राकडून पैशाची रसद चालू राहू दे…. अरे म्हणून तर विठ्ठलाने जगांच् रहाटगाडग्यात हस्तक्षेप नाही केला. शुद्ध अंतःकरणाने पुजा केली असती तर त्याने केव्हाच महाराष्ट्राला कोरोना मुक्त केले असते. पण नाही आमच्या मामुचा स्वार्थ पहिली लाट, दुसरी लाट, विठ्ठला तिसरी लाटपण येवु दे,अन् माझं घर भरु दे आणि तुझी केंद्राकडून टांकसाळ चालू ठेवली. मामु विठ्ठल एक संधी तर देतो. त्या संधीचं सोनं न करता – कोरोनाला ढाल बनवंल आणि दुस-या वर्षी अनावर विठ्ठल भक्तांवर तीच् सक्ती करण्यात मामु नी धन्यता मानली.
ह्यावेळी भक्तांचे अनावर अश्रू, विठ्ठल भक्तांची अनावर भेट, विठ्ठल भक्तांची अनावर वारी, आणि त्यात मामु तुझ्या बरबटल्या हातानी स्वार्थी पुजा – मामु आता मात्र भक्तांच्या भेटीला आतुर विठ्ठल, भक्तांच्या साकड्याला बद्ध विठ्ठल, भक्तांच्या भक्तिभावात रंगणारा अंतरंगी विठ्ठल – आणि कर्तव्याला चुकलेल्या मुख्यमंत्र्याच्या पुजेने बाधित विठ्ठल. आता मात्र ख-या विठ्ठल भक्तांच्या अनावर आर्ततेने फोडलेल्या टाहो ने, विठ्ठलाच्या नयनात अश्रू जमा झालेत. तुला मामु केल्याची चुक विठ्ठलाच्या लक्षात आली, सामान्य जनतेने सोसलेली छळवणुक, मामुचा भ्रष्टाचार आणि अंतरंगी तुझा झालेला हिरवा रंग. मामु कुठल्याही रंगाचा विठ्ठलाला आक्षेप नाही पण विठ्ठल अंतरंगातील रंग जाणतो. व्यथित विठ्ठलाने तुझे अंतरंगातील काळे-हिरवे रंग जाणले. तुला मुख्यमंत्री केल्याने, भक्तांना मिळालेल्या शिक्षेची जाणीव विठ्ठलाला झाली आणि विठ्ठल भक्तांच्या मायेखातर अश्रूपुर्ण नयनाने ढसा ढसा ओक्साबोक्शी रडला. त्याचे पडसाद, त्याचे चिंब अश्रू चिपळूण, कोकण, कोल्हापुरात धो धो बरसले. मामु तुमचा सं-जयचंद कंपांउंडर जरी ह्याला अनैसर्गिक पाऊस म्हणत असला तरी तुमच्या हातची पुजा विठ्ठलाला भावली नाही – तुमची स्वार्थी भक्ती विठ्ठलाला गावली नाही आणि अश्रूपुर्ण नयनांनी, तुमची व्यथित विठ्ठलाने विनवणी करीत तुम्हाला शेवटली संधी दिली आहे. आतातरी भक्तांना मोकळे करा. मामु तुम्हाला सुद्धा केंद्राकडे टांकसाळ ची संधी दिली आहे. पण महाराष्ट्र पक्षात पुराने झालेल्या नुकसानीचे महापातक तुमच्या माथी लागले आहे. हा कलंक कसा धुवायचा हे सर्वस्वी माझा पक्ष – माझी जबाबदारी.
पण आता ही शेवटची संधी ह्यानंतर परत असे कराल तर कदाचित पुरात वाहून जाणा-यात मामु तुमचा नंबर राहणार हे मात्र निश्चित.

भाई देवघरे

Leave a Reply