शिवसेनेची ‘भास्कर’ प्रकरणी केंद्रावर आगपाखड


मुंबई: २४ जुलै- देशभरात पेगॅसस प्रकरण आणि त्यापाठोपाठ मोबाईल हॅक केलेल्या राजकीय, माध्यम आणि सामाजिक विश्वातील लोकांची यादी यावर मोठी चर्चा सुरू असतानाच प्रथितयश माध्यम समूह भास्करवर आयकर विभागानं छापे टाकल्याने विरोधकांनी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. प्रसारमाध्यमांचा गळा घोटण्याचा हा प्रकार असल्याची टीका करण्यात येत आहे. दरम्यान, भास्कर समूहावर टाकण्यात आलेल्या छाप्यांवरून आज शिवसेनेने केंद्र सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘सामना’ अग्रलेखातून या मुद्द्यावर आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण करून देण्यात आली आहे.
रकारपुढे झुकण्याची किंवा याचक म्हणून दारात उभे राहण्याची ‘भास्कर’ची परंपरा नाही. थोडक्यात, इतर माध्यमांप्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाहीत. त्यांनी कोणत्याही सरकारवर अवाजवी टीका केली नाही वा गुडघे टेकले नाहीत. बहुधा त्यांचं हे कृत्य कुणाला देशद्रोही वाटलं असेल. त्यामुळेच त्यांच्या कार्यालयांवर छापे मारून वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजवण्याचा प्रयोग सुरू केला गेला आहे. असं असेल, तर ते स्वत:साठीच खड्डा खणत आहेत. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली खरी. पण त्याचा गैरफायदा घेऊन पडद्यामागे सूत्र हलवणारे दुसरेच चांडाळचौकडीचे लोक होते. आणीबाणीपेक्षा आता वेगळं काय घडतंय? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

Leave a Reply