मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे

मुंबई: २४ जुलै- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज शनिवारी दुपारी १२ वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचल्यानंतर ते वाहनाने तळीये गावाकडे रवाना होणार आहेत. दुपारी तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. त्याचबरोबर ग्रामस्थांशी संवाद साधतील. नंतर ते परत महाडला येतील. नंतर मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत.
तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतील, असं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, दरड कोसळेल्या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. मदतीसाठी एनडीआरएफबरोबरच लष्करालाही पाचारण करण्यात आलं असून, शनिवारी सकाळपर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दोन ठिकाणांहून हे मृतदेह काढण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर ३५ जखमी झालेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply