प्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांचं निधन

मुंबई २४ जुलै – मराठीतील प्रसिद्ध कवी, संपादक व सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. झोपत असतानाच त्यांचं निधन झालं. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या त्यांच्या पुस्तकाला २०१४ सालच्या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
काळसेकर यांचं यांचा जन्म सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी झाला होता. त्यांचं शालेय शिक्षण सिंधुदुर्गमध्येच झालं. पुढे मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ज्ञानदूत मासिक व ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये नोकरी केली. काळसेकर यांच्या साहित्य निर्मितीची सुरुवात काव्य लेखनानं झाली. सुरुवातीला काळसेकर यांच्या महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा यांसारख्या वर्तमानपत्रातून कविता प्रसिद्ध झाल्या.
१९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला. या कविता संग्रहानं त्यांना साहित्य वर्तुळात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. कविता, अनुवाद, गद्य असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळले.

Leave a Reply