चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची तिबेटला पहिल्यांदाच भेट

बीजिंग: २४ जुलै- तिबेटच्या दौर्‍यावर पहिल्यांदाच गेलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी धोरणात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या नियांगची या गावाला भेट दिल्याचे वृत्त येथील सरकारी माध्यमांनी आज दिले आहे. शी जिनपिंग यांनी भारत-चीनच्या सीमेवरील गावाला दिलेल्या महत्त्वपूर्ण भेटीचे वृत्त चीनच्या अधिकृत माध्यमाने दडवून ठेवले होते, हे विशेष
भारत-चीनवरील या गावाला भेट देणारे ते पहिलेच चिनी नेते ठरले आहेत. नियांगचीच्या भेटीदरम्यान शी जिनपिंग यांनी नियांग नदीच्या पुलाला भेट दिली. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्‍यात असलेल्या पर्यावरण परिसंस्थेची पाहणी त्यांनी येथे केली. सध्याच्या चौदाव्या पंचवार्षिक योजनेत चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर मोठे धरण उभारण्यास मंजुरी दिली असून, त्याबाबत भारत आणि बांगलादेशने चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Reply