वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

एक टिपूभक्त । विठू पूजनाला
वेगाने निघाला। पंढरीला ।।

हिरवा विचार । हिरवा आचार
अंगार अंगार । झाला विठू ।।

म्हणे रख्माईस । काय दिसं आला
भगवी पताका । लया गेली ।।

बकरी इदेस । मुक्त असे सारे
भक्तांसाठी का रे । बंद बंद ।।

टिपू आणि चिष्ती । आता यांचे देव
नुरले या भेव । नाही लज्जा ।।

चाल रखुमाई । नको इथे राहू
आणखी पतन । न ये पाहू ।।

      कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply