मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनाचा ठावठिकाणा

ज्याच्यावर आपली सगळी सुख दुख अवलंबून असतात किंवा जे ह्य सगळ्यांचा उगम स्थान आहे. ते मन.
पण हे मन नक्की असता कुठं ? ह्याचा नक्की ठाव ठिकाणा कुठे?
आत्ता ज्याचा ठिकाणाचं माहीत नाही त्या साठी काय करायचा ?
मन हे फार भयानक आहे . त्याला सतत शरीराला ताब्यात ठेवायचंय. आपण जेवढं त्याला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढा ते अवघड होत जात. आपला मन हे सतत काम करत असतं आणि त्यातूनच त्याला ऊर्जा मिळते .
काही जाणं वेगवेगळ्या मार्गाने अभ्यास करतात आणि त्यांना असा वाटत की माझा मन निर्विकार झालं. आत्ता माझया मनात एकही विचार नाही. पण गम्मत अशी आहे की तुमच्या मनात विचार नाही हाच विचार कायम चालू असतो, मन फक्त असा भासवत की बघ तुझ्या मनात कुठलाच विचार चालू नाही.
मनात कुठलाच विचार नाही हा विचार मात्र चालू असतो .
गम्मत बघा एकदा का तुमची सकाळी चिडचिड झाली की आपोआप ती वाढत जाते तुम्ही खूप प्रयत्न करता की थांबायला पाहिजे पण नाहीच. मन तस होऊ देत नाही कारण तसं झाला तर मन दुबळं होईल . म्हणून ते अजून विचार करायला लावत . आणि अजून चिडचिड वाढते.
अजून एक गम्मत बऱ्याच वेळा एखादा नाव किंवा गोष्ट ओठांवर असते पण आपण विसरून जातो खूप प्रयत्न करतो पण अगदी ओठांवर आलेलं आठवत नाही. नंतर तो विषय सोडून आपण दुसऱ्या कामात मग्न होतो आणि अचानक आठवत.
मनाला एकदा का एखाद्या गोष्टीची चटक लागली की संपल तरी सतत तेच तेच चालू राहत. आपल्याला राग आला की मन पूर्ण मेंदूचा ताबा घेत आणि आपण असा काहीतरी करून बसतो की पुढचे बरेच तास किंवा दिवस विचार चालू. मन पुन्हा जिंकलं.
एखादा आवडीचं पुस्तक किंवा सिनेमा आपण बघत असलो की मन पुन्हा पूर्ण ताबा घेता आणि त्या वेळेस आपण तहान भूक किंवा कोणी ओरडतंय साफ विसरून जातो.

पल्लवी उधोजी

Leave a Reply