ब्रिटन उद्यापासून पूर्णपणे निर्बंधमुक्त – जगभरातील संशाेधकांना चिंता

लंडन: १८ जुलै- उद्या साेमवारपासून ब्रिटनमधील संपूर्ण निर्बंध हटविण्यात येणार आहे. त्यावर जगभरातील १२०० संशाेधकांनी चिंता व्यक्त केली. ब्रिटनचे अनलाॅक जगासाठी धाेक्याची घंटा ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. ब्रिटन हे जागतिक परिवहन केंद्र आहे. येथे नवा काेराेना व्हेरिएंट आढळून आला तर त्याचा जगभरात फैलाव हाेण्यास फार वेळ लागणार नाही.
मेडिकल जर्नल ‘लॅन्सेंट’ मध्ये ब्रिटनच्या अनलाॅक याेजनेसाठी एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये अनलाॅक असल्याने लसीला न जुमानणाऱ्या काेराेना व्हेरिएंटला फैलावाची संधी मिळणार आहे. त्यातून लसीकरणाची रणनीती कमकुवत हाेईल. सुमारे १२०० संशाेधकांनी या अहवालाचे समर्थन केेले आणि तसे पत्रही लॅन्सेंटला पाठवले आहे. न्यूझीलंड, इस्रायल, इटलीचे संशाेधक, डाॅक्टरांनी एका शिखर संमेलनात ब्रिटनच्या या
निर्णयावर टीका केली आहे. न्यूझीलंडमध्ये तज्ज्ञ मायकेल बेकर म्हणाले, आम्ही वैज्ञानिक अभ्यासासाठी ब्रिटनकडून प्रेरणा घेताे. अनलाॅकची ही याेजना मात्र आम्हाला चकित करत आहे.

Leave a Reply