वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

ठाण्यामध्ये स्वर्ग उतरला !

काल एक अतिशय सुखावणारी बातमी मीडियावर व्हीडिओसकट आली
एका माफिया डॉनची बर्थडे पार्टी जेलमधे ठाणेदाराच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिपायांच्या साक्षीने झाली !
डॉनने ठाणेदाराला केक भरवला !
ठाणेदाराने डॉनला भरवला !
अहा हा ..! असं सुंदर ,अनुपम, विलोभनीय दृश्य जगात कुठे बरं बघायला मिळणार ! ,आणि,
‘भूत’दयेचं एवढं चांगलं उदाहरण
शोधूनही आहे का कुठे सापडणार !
चोर, डाकू, डॉन झाले म्हणून काय झालं ! ती पण माणसेच आहेत !
त्यांनाही भावभावना आहेत !
अरे, आज ते जेलमधे आहेत !
उद्या तुमच्यावर जर अशी पाळी आली तर ? तुम्हालाही असे वाटेलच कि नाही कि आपल्यालाही असंच घरच्यासारखं वातावरण जेलमधे मिळालं पाहिजे !
कैद ही कैद्याला कैदाशीण आणि स्वर्गही नाही पण किमान घरासारखी तरी वाटली पाहिजे !
शेवटी जेल म्हणजे एक सुधारगृहच झालं पाहिजे !
आता कैदी सुधारत नसतील तर किमान ठाणेदार, शिपाई म्हणजे सरकारनेच स्वतःला सुधारायला पाहिजे !
एकंदरीत या धरतीचा स्वर्ग होण्याची प्रक्रिया ठाण्यांपासूनच सुरू झाली पाहिजे !

     कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply