ठाकरे सरकारचा धान उत्पादकांना झटका, ३० जूनपर्यंतच नोंदणी झालेले धान खरेदी करणार

गोंदिया:१७ जुलै- गोंदिया जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील धान खरेदीसंदर्भात गत अनेक पत्र काढण्यात आली. रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहसचिवांनी आणखी एक पत्रक काढून पूर्व विदर्भातील धान उत्पादकांवर आघात केला आहे. ३० जूनपर्यंतच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचेच धान २२ जुलैपर्यंत खरेदी करण्यात यावे, असे यात नमूद आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्याचा काही भाग व कोकणात खरीप व उन्हाळी हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत दोन्ही हंगामात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन मुंबई अंतर्गत जिल्हा पणन कार्यालय आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून उपअभिकर्ता संस्था शेतकर्यांकडील धान खरेदी करतात. मात्र, यंदा महाविकास आघाडी शासनाच्या नियोजनशून्यतेचा फटका धान उत्पादकांना बसला आहे. दोन्ही हंगामातील धान खरेदी संदर्भातशासनाने आतापर्यंत डझनभर पेक्षा अधिक पत्रके काढली. अद्यापही खरीप हंगामातील 84 टक्के धानाची उचल झालेली नाही.

Leave a Reply