सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

महाराष्ट्रात भिंद्रनवाले पॅटर्न

अरे ! अरे ! असे चमकु नका शिर्षक बघुन. पण एका अर्थी हे खरे आहे. एखाद्या समाजाची गठ्ठा मते एकत्रित करायची असतील तर हा एकदम परिपुर्ण, लागु करता येण्याजोगा नमुना आहे.
१९७५ आणिबाणी लागु झाली ती १९७७ पर्यंत कायम होती. त्या काळात कॉंग्रेस सरकारने जनतेचे अगणित हाल केले. भारतीय जनता स्वतंत्र झाल्यानंतर ह्या प्रकारचे असह्य दबाव तंत्र पहिल्यांदा अनुभवत होते. लोकशाहीची गळचेपी, ती सुद्धा अवघ्या २८ वर्षात – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर!!! जनतेच्या विचार कक्षेच्या पलिकडे गेलेले कॉंग्रेसी राजकारण. भारतीय जनतेत प्रचंड रोष – आक्रोश आणि त्याची परिणती शेवटी १९७७ झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची धुळधाण उडाली. कॉंग्रेस आपली विश्वासार्हता पुर्णपणे गमावून बसली आणि राज्याराज्यातील निवडणुकीत कॉंग्रेस धुळ चाटत राहिली, धाराशायी झाली.
पंजाब मध्ये पण कॉंग्रेस जाऊन अकाली दल आले. कॉंग्रेस आपली जमीन गमावून बसला. १९७५ – १९७७ भारतासाठी दोन अतिशय वाईट वर्षे होती. असंख्य यातना दिल्या गेल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कार्यकर्ते तर अक्षरशः भरडून निघाले. त्यांना सुद्धा असंख्य अत्याचारांना बळी पडावे लागले आणि ह्या सर्वांचा शेवट अर्थातच कॉंग्रेस चे पतन झाले. पंजाब प्रांत सुद्धा ह्या पेक्षा वेगळा नव्हता.
त्यावेळचे अस्वस्थ माजी मुख्यमंत्री ज्ञानी झेलसिंग ह्यांचे मुख्यमंत्री पद गेले आणि “खाली दिमाग शैतान का कारखाना” सत्ता परतीसाठी येन केन प्रकारेण शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी तत्कालीन पुर्व मुख्यमंत्री ज्ञानी झैल सिंग, संजय गांधी, इंदिरा गांधी ह्यांनी भिंद्रनवाले ची आपापसातील संमतीने योजना आखली.
शिख समाज कॉंग्रेस पासून विलग झाला होता. शिख समाज कॉंग्रेस ला डावलून “अकाली दल” कडे झुकला होता. शिख समाजाविना सत्ता वापसी अशक्य हे जाणून. कॉंग्रेस ने “भिंद्रनवाले” ला निवडले आपला मोहरा म्हणून. जो शिख समाजाची गठ्ठा मते कॉंग्रेस ला देवू शकेल असा “जादुई चेहरा” भिंद्रनवाले. शिख समाजाची गठ्ठा मते कॉंग्रेस ला देण्यासाठी भिंद्रनवाले वाले ची निवड करण्यात आली. भिंद्रनवाले च्या इतिहासात मी जात नाही. पण हा “दमदमी ताकसाल” चा प्रमुख. कट्टर शिख. “दमदमी ताकसाल” ही शिख समाजाची – शिख धर्म शिकविण्याची एक मोठी संस्था. ज्या संस्थेला प्रत्येक शिख मान्यता देतो आणि शिरोधार्थ मानतो. अकाली दल हा पक्ष सुद्धा तेव्हा धार्मिक आधारावर संरचित होता आणि अकाली दल ची स्थापना १९२० साली झाली होती. आणि धार्मिक आधारावर अकाली दल ला टक्कर देण्यासाठी भिंद्रनवाले ही योग्य व्यक्ती होती.
आता महाराष्ट्राच्या वातावरणाकडे बघितले तर २०१९ शिवसेना, भाजपाला सोडून, आपल्या हिंदुत्ववादी विचारधारेला तिलांजली देत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या तत्वांची खिल्ली उडवंत कॉंग्रेसी तख्तापुढे मॅडम ला मुजरा कराया लागली, घड्याळ्याच्या काट्यांवर नर्तन करीत मुसलमान धार्जिणी झाली. तसा हळूहळू मराठा समाजाचा शिवसेनेवरील विश्वास ढासळु लागला. पुढे हळूहळू एक गोष्ट लक्षात आली की शिवसेना नेतृत्व बोलते खुप गोड पण करते हिंदुंची तोडफोड, त्यात “मराठा समाज” शिवसेनेच्या अजून दूर गेला. आज महाराष्ट्रात मराठा समाज ३०% एकहाती सत्ता देण्याची आणि सत्तापालट करण्याची क्षमता असणारा. असा समाज हळूहळू शिवसेनेच्या दूर व्हायला लागला. मग मराठा आरक्षण न मिळाल्याने मराठा समाज शिवसेनेच्या कार्यप्रणाली आणि कर्तृत्वावर शंका उपस्थित करायला लागला आणि ओबीसी समाजाचा आरक्षण जेव्हा कोर्टाने नाकारले तेव्हा ह्या संपूर्ण मराठा आणि मराठी समाजात असंतोष झाला आणि शिवसेने पासुन ही गठ्ठा मते दुर जाऊ लागली आणि पर्यायाने ही गठ्ठा मते मविआ आघाडी पासून दूर जाऊ लागली. समयाधीशांचे इप्सित साध्य झाले होते. त्यांनी शिवसेनेचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर उभा केला आणि ही विखुरलेली मराठा समाजाची गठ्ठा मते एकत्रित करण्यासाठी ‌समयाधीश करिश्माई चेह-याच्या शोधात होते. असे विधान करायला हरकत नसावी. ह्यामागे राष्ट्रवादी का भाजपा – हा वादाचा मुद्दा. जिथे जिथे राष्ट्रवादी तिथे तिथे भ्रष्टाचार आणि वाद. असे लोकं म्हणतात.
इकडे १९७७-७८ भिंद्रनवाले एक कट्टर शिख समाजाचा दमदमी ताकसालचा अध्यक्ष, ज्याची शिख धर्मावर पकड आहे. आणि जो “निरंकारी*” शिख समुदायाला मानत नाही अशा व्यक्तीमत्वाला जनतेसमोर कॉंग्रेस पक्षाने आपल्याकडुन पैसा वगैरे जे काही लागते, त्या सगळ्या सोयी पुरविण्यास प्रारंभ केला. त्याची जनतेवरील पकड घट्ट करण्यासाठी, शिख समुदायाच्या अगदी छोट्या छोट्या मांडलेल्या समस्या, भिंद्रनवाले च्या दरबारात – कॉंग्रेस शिरसावंद्य मानून भिंद्रनवाले तर्फे मार्गी लावत आणि अध्यात्मिक नाही तर साध्या साध्या समस्या सोडविण्यासाठी भिंद्रनवाले हे पंजाब साठी सर्वतोपरी आहेत, हे शिख समाजासमोर रुढ करण्यात आले. छोट्या छोट्या समस्या म्हणजे अगदी माझे इलेक्ट्रिक मीटर नाही आले – समस्या समोर येताक्षणी कथित पिडिताचे घरी लगेच इलेक्ट्रिक मीटर लावण्यात येई. गॅस सिलेंडर नाही मिळत ही समस्या येताक्षणी त्याचे घरी गॅस सिलेंडर पोचवले जाई. अशा त्यावेळच्या गोष्टी ऐकिवात आहेत. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की भिंद्रनवाले ज्याला कॉंग्रेस ने जनतेसमोर आणला होता, तो भिंद्रनवाले आता शिख समाजाच्या गळ्यातील ताईत बनला आणि शिख पंजाबी समाज आता पुर्णपणे भिंद्रनवाले च्या हातातील बाहुले बनला. परिणामी १९८० निवडणूक कॉंग्रेस पक्ष ६३ जागा जिंकत एकहाती बहुमताने निवडून आला. अकाली दल ३७ जागांवर आणि भाजपा १ सीट घेवून निवडून आले. पंजाब राज्य एकुण जागा ११७ आणि बहुमतासाठी ५९ जागा.
काय महाराष्ट्रात सुद्धा हाच खेळ खेळल्या जातोय? आता शिवसेनेची आणि मविआ ची विखुरलेली मते, गठ्ठा एकत्रित करण्यासाठी, मराठा समाजाचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची निवड केल्या गेली. मराठा आरक्षणावर कुटील राजनिती खेळत, गतसरकारने दिलेले आरक्षण फशी पाडंत, मराठा समाजाला विघटीत करण्यात आले आणि आता ही मराठा समाजाची गठ्ठा मते “घड्याळाकडे” वळविण्याचा एक मोठा डाव रचण्यात आला. शिवसेना म्हणजे “जो समयाधीशावरी विश्वासला – त्याचा कार्यभार, सीट भार बुडाला”.
आणि ह्याचे साठी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ह्यांची निवड करण्यात आली. शांत असलेले संभाजी राजे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले, मोर्चा काढण्यात आला आणि हळूहळू मराठा समाज संभाजी राजांच्या अधिपत्याखाली येत आहे. त्यांचा मोर्चा, टीव्ही वर त्यांना देण्यात येणारे फुटेज – हे सगळे एकगठ्ठा मराठा समाजाच्या विखुरल्या, मतांना एकत्रित करण्याची प्रणाली. त्यांच्या मराठा मोर्चा वरील घेतला गेलेला आक्षेप (#कोरोना) आणि गुन्हे माफ करण्यात आले आहे. आणि ज्याप्रकारे पंजाबात घडले तोच कार्यप्रणाली चा नमुना संभाजी राजांकरीता प्रचलित करण्यात येत आहे. जेणेकरून एकछत्री मराठा मते संभाजी राजांच्या म्हणण्यानुसार मते वळवतील आणि संभाजी राजांची प्रतिष्ठा, मान अजुन दुणावेल. आणि जो नमुना कॉंग्रेस पंजाबमध्ये भिंद्रनवाले ला मध्ये ठेवून खेळली गेली तीच् खेळी महाराष्ट्रात खेळली जात आहे.
आता ही चाल कोणाची? राष्ट्रवादी की भाजपा? याबद्दल दुमत असले तरी एक मात्र निश्चित की मराठा समाज शिवसेनेपासून दूर करण्यात समयाधीशांना, यश प्राप्त झाले आहे. ह्या पुढे पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचा – तत्वावर चाललेली गाडी, पुढील शंभर वर्षे तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्याच्या लायकीची ठेवली नाही. एका गद्दारी ची किंमत शिवसेना आजन्म भोगेल. “सरकार” हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी एक जबरदस्त वाक्य आहे आणि त्यात अमिताभ बच्चन ची आवाजाची फेक, लक्ष वेधून घेते. “नजदीकी भविष्य का फायदा देखने से पहले दूर का नुकसान, पहले देखना चाहिए”. बस्सं… इथेच कंपाउंडर कमी पडला आणि आता शिवसेनेला भविष्याचा मांडलिक करून बसला. आणि सत्ताधीश म्हणा किंवा भाजपा म्हणा मराठा मतांचे एकत्रिकरण करण्यात यशस्वी होतील की नाही हे भविष्य ठरवेल. शिवसेना मात्र ह्या मतांसाठी कायमची पारखी होणार हे निश्चित.
एक गोष्ट नमूद करु इच्छितो की भिंद्रनवाले मुळे १९८० नंतर जे काही घडले, खलिस्तान आतंकवाद वगैरे वगैरे त्याचा इथे संदर्भ घेण्यात आला नाही. इथे तो नमुना जो गठ्ठा शिख मते वळविण्यासाठी भिंद्रनवाले ना योजिले होते मतांतरासाठी, तिथपर्यंत सिमित आहे. कारण माननीय ज्ञानी झेलसिंग, संजीव गांधी, इंदिरा गांधी ह्यांनी शेवटी मान्य केले की भिंद्रनवाले ह्या थराला जाईल ह्याची यत्किंचितही कल्पना नव्हती. आणि ही आमची घोडचूक होती कारण शेवटी ह्यात इंदिरा गांधींचा बळी गेला आहे.

भाई देवघरे

Leave a Reply