शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : १५ जुलै – महाविकास आघाडी सरकारमध्ये बैठकांचे सत्र अजूनही सुरूच आहे. मंत्र्यांसोबत बैठक घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता वर्षा निवास्थानी दाखल झाले आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहे.
आज सह्याद्री अतिथीगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भूसे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. राज्यातील विविध प्रश्नांवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहे.
दरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर दादा भूसे यांनी माहिती दिली. ‘शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज अजित पवार आणि आदिती तटकरे यांच्यासोबत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णय घ्या, आशा सुचना पवार यांनी दिल्या. फलोत्पादकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातदार यांच्या देखील तक्रारी होत्या, असंही पवार यांनी सांगितलं.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात उत्तम काम केलं आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे’, असं कौतुकही शरद पवार यांनी केल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं.
‘पिकविम्याची मुदतवाढ द्यावी यासाठी केंद्राला पत्र लिहिले आहे. हे करत असताना राज्यावर कोणताही अतिरिक्त बोझा पडू नये, यासाठी देखील विनंती केली आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी आमच्याकडे संख्याबळ आहे. आम्ही कोणत्याही मतदानाला घाबरत नाही. ते गुप्त असो किंवा आवाजी मतदान असो. अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होणार आहे, असंही भुसे म्हणाले.

Leave a Reply