युजीसीनं वगळला अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास, हिंदू राज्यकर्त्यांच्या शौर्याचे गिरवणार धडे

नवी दिल्ली: १५ जुलै-विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने इतिहासाच्या अभ्यासक्रमामधून मोगलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय़ घेतला आहे. पदवीपूर्वी अभ्यासक्रमांच्या इतिहासामध्ये अकबर आणि मोगलांपेक्षा महाराणा प्रताप आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या इतिहासावर अधिक भर दिला जाणार आहे.
इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा यूजीसीने तयार केला आहे. यामध्ये भारतावर आक्रमणं करणाऱ्या आणि येथील अनेक वास्तू उद्धवस्त करणाऱ्या मुस्लीम आक्रमकांऐवजी भारतीय राज्यकर्त्यांच्या कामगिरीवर आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘हिस्ट्री ऑफ इंडिया (इसवी सन १२०६ ते १७०७)’ अंतर्गत इतिहासामध्ये आता हिंदू राज्यकर्त्यांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे.
वैदिक काळातील भारत कसा होता, वेद आणि उपनिषदे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, यूजीसीकडून जाणीवपूर्वक पद्धतीने हे बदल केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. जातीव्यवस्था दूर करण्यासाठी झालेल्या सामाजिक आंदोलनांना इतिहासाच्या अभ्यासक्रमात महत्व दिले पाहिजे, असे काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ट्विटरवरुन यासंदर्भातील नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply