हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती, शिवसेनेचा पटोलेंना टोला

मुंबई: :१४ जुलै-शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता टोमणा मारतात, हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या वक्तव्यांमुळे सध्या चर्चेत आहेत. नाना पटोले यांच्या वक्तव्यावरुन विरोधक ठाकरे सरकारवर निशाणा साधत असून, महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची टीका करत आहेत. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील नाना पटोले यांना लहान माणूस म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. दरम्यान, शिवसेनेने आज ‘सामना संपादकीयमधून नाना पटोलेंच्या वक्तव्यांवर भूमिका मांडली आहे.
नाना पटोले हे मोकळय़ाढाकळय़ा स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना पटोले, असं शिवसेनेने म्हटलं आहे. नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी-कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले. नाना काय-काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

Leave a Reply