भाजप नगरसेविकेच्या पतीने लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बनवले बंधक

नागपूर : १४ जुलै – नागपूर शहरातील भाजप नगरसेविका रुपाली ठाकूर यांचे पती परशु ठाकूर यांनी लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार पुढे आला आहे. ही संपूर्ण घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. चक्क लसीकरण केंद्रच हायजॅक केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
झालं असं की, लसीकरण केंद्र बंद झाल्याची वेळ झाली होती. शारदा चौक येथील पालिका शाळेच्या लसीकरण केंद्र बंद करत कर्मचाऱ्यांनी वायल परत पाठवण्याची तयारी सुरू केली होती, मात्र उरलेले वायल मधून नागरिकांना लसीकरण करा अन्यथा वायल आणि तुम्हाला आम्ही बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकी परशु ठाकूर यांनी दिली.
यानंतर परशु ठाकूर यांनी लसीकरण केंद्राचे दार बंद करून सर्वांना डांबून ठेवले. महिला कर्मचाऱ्यांनी विरोध केला नंतर लसीकरण केंद्राचे दार उघडले नाही. शेवटी महिला महिला कर्मचाऱ्यांनी शंभर क्रमांकावर फोन करत पोलिसांना केला. थोड्या वेळात पोलीस आले आणि त्यानंतर त्या महिला कर्मचाऱ्यांची सुटका झाली.
या प्रकरणी ज्यांच्यावर लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचा आरोप आहे ते भाजप नगरसेविका रुपाली ठाकूर यांचे पती परशु ठाकूर यांचं या घटनेबद्दल काय मत आहे हे जाणून घेतले. परशु ठाकूर यांनी आपल्यावरील ससर्व आरोप फेटाळून लावले. तसेच मी कुमालाही डांबून ठेवलेचं नाही असाही दावा त्यांनी केला.

Leave a Reply