धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं, आ. मिटकरींचे पंकजा मुंडेंना उद्देशून ट्विट

मुंबई::१४ जुलै- माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असल्याचं पंकजा मुंडे यांनी मंगळवारी स्पष्ट केलं होतं. मी कोणालाही घाबरत नाही, मला दिल्लीत कोणीही जाब विचारलेला नाही, पंतप्रधानांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अकोल्यातील आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला असून, ‘नरो वा कुंजरोवा’ होऊ देऊ नका असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं असून, या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवल्या गेलं असल्याचं म्हटलं आहे.
ताईंनी कौरवांना चांगलंच झोडपलं. ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका. या धर्मयुद्धात तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय. मामुसोबत डोक्याला तेल लावलेले धर्मराज व दुःशासन पण आहेत, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

Leave a Reply