देशात विरोधी पक्षाचा चेहरा कोण? एकत्र बसून ठरवा- खा. संजय राऊत

मुंबई:१४ जुलै- शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना देशातील विरोधी पक्षाचा चेहरा कोण असेल, याबाबत आपले मत मांडले. आपल्या देशामध्ये विरोधकांची एकजूट ही एक गहन समस्या निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक राज्यातला विरोधी पक्ष स्वतःला बादशहा मानतो. अशा मानसिकतेमध्ये सर्वांची एकजूट होणे ही जरी गरज असली, तरी त्या एकजूटीला नेता असणे गरजेचे आहे. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी जेव्हा विरोधी पक्षांचा पराभव केला तेव्हा, विरोधी पक्षाला जबाबदार चेहरा मिळाला. याक्षणी असा चेहरा कोण आहे हे विरोधी पक्षांनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्ष एकत्र यायला पाहिजे. विरोधी पक्षामध्ये फूट असेल, तर आघाडी कशी काय जन्माला घालणार, असेही संजय राऊत म्हणाले.
प्रशांत किशोर काँग्रेस नेत्यांना भेटत असतील, तर हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला प्रशांत किशोर यांच्याकडून मदत झाली. गेल्या काही दिवसात ते शरद पवारांनासुद्धा भेटले आहेत. त्यासंदर्भात शरद पवारांकडून किंवा गांधी कुटुंबाकडून कोणती माहिती समोर आली नाही. तुम्ही जे सगळं सांगता आहात त्या हवेतल्या फैरी आहेत. प्रशांत नक्की काय काम करतात, याच्याविषयी अधिकृतरित्या बाहेर आलेलं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply