वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

गुरुदक्षिणा !!

पूर्वी आमच्या गावातील सफाई कामगारांची टोळी त्यांचे दोरखंडाचे फास आणि काठ्या घेऊन आली , कि,
गटारात ऐषारामात लोळणाऱ्या
वराहांची पळापळ सुरू व्हायची !
तसेच —
भटक्या कुत्र्यांना पकडणारी नगरपालिकेची गाडी आली कि गल्लीतली तमाम कुत्री सैरावैरा पळत सुटायची !
त्याचप्रमाणे —
केंद्रात कोणीतरी सहकार मंत्री झाल्याचे आणि लवकरच ते राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे ऐकून ,
सहकाराचा स्वाहाकार करणाऱ्या तमाम महापुरुषांची झोप उडाली आहे !
त्यांचे धाबे दणाणले आहेत !
पण त्रैलोक्याचे ज्ञान असलेल्या महानारदांना मात्र त्यांची अजिबात भीती वाटत नाही !
वाटत असली तरी ते तसं दाखवत नाहीत !
कारण , काहीही झालं तरी ते केवळ साधेसुधे …राजेच नाहीत , तर ,
अनभिषिक्त सम्राट आहेत , सहकार क्षेत्राचे !
तसेच ते ” गुरू ” सुद्धा आहेत देशाच्या प्रधानांचे !
मग त्यांना योग्य वेळी ‘ गुरुदक्षिणा ‘ देणे हे चेल्याचे कर्तव्यच नव्हे काय ?

     कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply