वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

कोरोना मित्र !

कोरोना हा जाता जाता पुन्हा परत आला ।
चला चला लागू या हो त्याच्या स्वागताला ।।

अम्हा मोकळे होण्याची आस कां नसावी ?
मास्क लावण्याची आम्हा सक्ती कां असावी ?
चला जाऊ सारे मिळुनी पर्यटनाला ।।

दुकाने नि मॉल सारे गर्दीने फुलावे !
अभिमन्यूवाणी आपण गर्दित शिरावे!
घरोघरी नेऊन सोडू कोरोनाबाबाला ।।

सरकार सुद्धा आम्हा मदतगार आहे !
अम्हासाठी दारूगुत्ते सर्व चालू आहे !
परी जाऊ ना देती ते अम्हा मंदिराला !

मास्क नाही वापरणारे परमवीर(?)माना !
गर्दी करणाऱ्या साऱ्यांना वीरचक्र (?) द्या ना !
करोनाच्या या मित्रांना जोडेहार घाला ! ।।

      कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply