भारतीय जनता युवा मोर्चाची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात धडक

अकोला : ९ जुलै – कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सहा हजार ४२० विद्यार्थ्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात धडक दिली. यावेळी कृषी तंत्र निकेतनचे अधिष्ठाता त्यासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासोबत या विद्यार्थ्यांनी चर्चा केली.
कृषी तंत्र निकेतन सण २०१८-२०२१ च्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या बेसवर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, तेही पदवीला प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या शिक्षणाला खंड लागणार आहे.
२०१७-२०२० या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम पूर्ण करून कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या व पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व सन २०१८-२०२१ च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा समान आहे. तरीसुद्धा २०१८-२०२१ या बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात येत आहे. दरम्यान, प्रवेश माहिती पुस्तकामध्ये कृषी पदवीच्या थेट पहिल्या व दुसऱ्या वर्षात प्रवेश नसल्याची माहिती असली तरी काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका देत नाही. विद्यार्थ्यांना भ्रमात ठेवून प्रवेश करून घेत आहेत.
सन 2018-2021 या बॅचमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची एकूण संख्या जवळजवळ सहा हजार 420 आहे. कृषी पदवीला प्रवेश मिळत नसल्याने हे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यांचे तीन वर्षांचे शैक्षणिक वर्ष त्यासोबतच आर्थिक नुकसान होणार आहे. तरी या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये धडक देण्यात आली. यावेळी भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदिवे यांच्यासोबत चर्चा केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमोने विद्यापीठाकडून लेखी आश्वासन घेतले आहे.

Leave a Reply