पत्रकार परिषद घेऊन आ. संजय गायकवाड यांनी आपले वक्तव्य घेतले मागे

बुलडाणा : ९ जुलै – खामगांव तालुक्यातील चितोडा येथे घडलेल्या दोन समाजातील वाद आता समाजस्याने निवळला असून आपण चितोडा येथे केलेले अस्त्र, शस्त्र, दहा हजारांची फौज हे वक्तव्य मागे घेतो. असा खुलासा आ. संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत घेवून केला. येथे मातोश्री जनसंपर्क कार्यालयात दुपारी आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. दहा हजाराची शस्त्र अस्त्र फौज उभी करेल हे वक्तव्य आपण वाघ कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी भावनेच्या भरात केले होते. वास्तविक हा दोन कुटुंबीयातील वाद असून मी कोणत्याही समाजाला उद्देशून बोललो नाहीे. त्या प्रवृती विरूद्ध मी बोललो. दरम्यान अँट्रॉसिटीच्या केलेल्या वक्तव्या संदर्भात आ. गायकवाड यांना विचारले असता अँट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात आपण बोललो नाही. कायदा हा संरक्षणासाठी आहे. अँट्रॉसीटी कायद्याचे आपण समर्थनच करतो परंतु खोट्या अँट्रॉसिटी करणार्या विरोधात आपण ठाम असल्याचे ते म्हणाले.
अधिक माहिती देतांना आ. संजय गायकवाड म्हणाले की, पोत्या व देवा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून वाघ कुटुंबांनी खंडणी मागितली.त्यावरून दोन कुटुंबात वाद झाला. या वादातून हे प्रकरण घडले. दरम्यान पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्यामुळे आपणाला तेथे जावे लागले व झालेला घटनाक्रम कळाल्यावरून आपण ते वक्तव्य केले. मी कोणत्याही सामाजाविरूद्ध कधीच नव्हतो व नाही. आतापर्यत मी अन्याया विरूध्द लढा देत राहीलो. मग तो कोणत्याही जाती, धर्माचा व पंथाचा असो मी कधीच मागे हटलो नाही. मात्र या प्रकरणात जातीय रंग देण्याचे काम काही लोक करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अँट्रॉसीटी कायद्याचा गैरवापर होतो. खोट्या केसेस दाखल केल्या जातात. त्याला अनुसरून मी अँट्रॉसीटी कायद्याच्या संदर्भात बोललो. माझा या कायद्याला विरोध नाही. चितोडा येथे दोन समाजात तेढ निर्माण झालेल्या वादग्रस्त प्रकरणात या गावात असलेल्या सचिन वाघ यांचे कुटुंब व गावकर्यांच्या मनात निर्माण झालेल्या भितीदायक घरांची जाळपोळ करण्याच्या घटनेमुळे त्यांना मानसिक आधार देण्यासाठी अस्त्र, शस्त्रासह, दहा हजाराची फौज घेवून जातो. हे वक्तव्य मागे घेतो असे आ. संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply