९ जुलै रोजी माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद डी. लिट.ने गौरविणार

नागपूर:८ जुलै- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षान्त समारंभाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार राहणार आहेत. या समारंभात भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना मानद डी. लिट. पदवी प्रदान केली जाणार आहे. कोरोना संकटामुळे प्रथमच हा समारंभ आभासी पद्धतीने होत आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी ही माहिती दिली.
याच कार्यक्रमात विद्यापीठाच्या चारही विद्या शाखांमधील एकूण ८६७ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान केली जाणार आहे. ७७ हजार ९१२ विद्यार्थ्यांना स्नातक व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. १0७ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १६0 सुवर्णपदके ९ रौप्य पदके, १९ पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत .

Leave a Reply