रेल्वे राज्यमंत्रिपदाची सूत्र स्वीकारताच दानवेंनी केली मुंबई लोकलबाबत महत्त्वाची घोषणा

नवी दिल्ली:८ जुलै-भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारताच, मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली, तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असं म्हटलं आहे.
लोकल सुरु करण्यासंदर्भातील जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात आली आहे. ज्यावेळी राज्य सरकारला वाटेल की, आता करोनाची स्थिती आटोक्यात आली आहे आणि रेल्वे सुरु करणं गरजेचे आहे, त्यावेळी राज्याने त्या ठिकाणचा अभ्यास करुन यासंदर्भात प्रस्ताव पाठवला, तर रेल्वे सुरु केली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे दानवे म्हणाले.
करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास बंदी कायम ठेवली आहे. मात्र, दिवसेंदिवस मुंबईकरांना प्रवास करताना त्रास सोसावा लागत आहे.

Leave a Reply