नक्षलवाद्यांना साहित्य पुरवणाऱ्या ८ आरोपींना अटक

गोंदिया : ८ जुलै – जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश जिल्ह्यातील बालाघाट पोलिसांनी नक्षलवाद्यांना साहित्य पुरवणाऱ्या आठ आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी नक्षलवाद्यांना नक्षली साहित्य, विस्फोटक आणि हत्यार पुरवठा करत होते. आरोपींना नक्षल सप्ताहादरम्यान अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून एके ४७ सह जिलेटीन रॉड, पिस्तुल, रायफल, कोडेक्स, दोन स्कोडा वाहन, एलईडी इत्यादी साहित्य जप्त केले आहेत. अटक झालेल्यांमध्ये गोंदिया, ठाणे, कोटा जिल्ह्यातील आरोपींचा समावेश. आरोपी हे महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना विस्फोटक साहित्य पुरवठा करण्साठी जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली. नक्षल सप्ताहादरम्यान मोठा घातपात करण्यासाठी नक्षल्यांना हा शस्रसाठा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती बालाघाट पोलिसांनी दिली.

Leave a Reply