अवैध दारूविक्रीच्या वादातून कुख्यात गुंडाची हत्या

नागपूर : ८ जुलै – नागपुरात कुख्यात गुंडाची विटांनी ठेचून हत्या करण्यात आली आहे. अक्षय जयपुरे असं मृतकचे नाव आहे. नागपूरच्या पांढरबोडी भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री १० वाजेच्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली. अवैध दारु विक्रीच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्षय जयपुरे असं हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. अक्षय जयपुरेवर खुनासह अनेक गुन्हे दाखल होते. त्याच्या हत्येने परिसरात दहशत माजली आहे.
अक्षय हा गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्हे दाखल होते. बुधवारी रात्री अक्षय हा पांढराबोडी परिसरात आल्याची माहिती आरोपांना मिळाली होती. त्यानंतर चौघांनी जाऊन अक्षयला घेरले आणि बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड घालून पळून गेले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. अवैध दारूविक्रीच्या वादातून प्रतिस्पर्धी टोळीने अक्षयची हत्या केल्याचे प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
एमबीडीए अंतर्गत नाशिक कारागृहात तो बंदिवासात होता. ६ महिन्यांपूर्वीच त्याची सुटका झाली होती. नागपुरातील अनेक गुंडप्रवृत्तीच्या लोकांसोबत त्याचे कायमच वाद होत होते. काही वर्षांपूर्वी नागपुरातील एका चित्रपटगृहात दारू पिऊन गोंधळ घातला होता, त्यानंतर तेथील लोकांनी त्याला ताकीद दिली होती. या घटनेनंतर त्वरित त्याने आपल्या इतर सोबतींना हत्यारे घेऊन चित्रपटगृहात बोलावले होते. त्या प्रकरणी हत्त्या करण्याचा प्रयत्नांतर्गत गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता. याप्रकरणी अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपस करत आहेत.

Leave a Reply