वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

याला अधिवेशन हे नाव !
(चाल – दोन घडीचा डाव , त्याला जीवन ऐसें नाव )

दोन दिसांचा डाव
याला अधिवेशन हे नाव !

विधीसभेचे पवित्र अंगण
खेळ खेळले त्यात असुरगण !
योजुन मस्त बनाव !
खेळले योजुन मस्त बनाव ! ।।

खोटेनाटे खरे करविले !
तऱ्हेतऱ्हेचे नाटक केले !
बनूनिया जणु साव !
वठविले बनूनिया जणु साव ।।

मनासारखा पडे डावही !
मनविलेत ते छद्म विजयही !
विरोधका नच वाव !
देवू विरोधका नच वाव ! ।।

भित्रे भागूबाई असुनी
आव आणिला जणु मर्दानी !
बघा रडीचा डाव !
त्यांचा बघा रडीचा डाव ! ।।

    कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply